खनिज पदार्थ म्हणून समावेशक अथवा शुद्ध माध्यम म्हणून वापरण्यासाठी: PERLIGRAN® हे शुद्ध नैसर्गिक परलाइट या खनिजापासून बनविले जाते. जमिनीचा दर्जा सुधारण्याकरिता जमिनीत घालून किंवा माती म्हणून वापरल्यास ते अनेक छोटी-छोटी मुळे वाढण्यास पोषक ठरते, व त्यामुळे भाज्या, औषधी वनस्पती आणि शोभेची झाडे अत्यंत फायदेशीरपणे फोफावण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करते.
PERLIGRAN® हे ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या मॅग्मा पासून जो खडक तयार होतो, त्यापासून बनविले जाते.
यासाठी एक विशेष परिष्करण प्रक्रिया वापरली जाते, जी "पॉप कॉर्न" तत्वावर आधारित आहे. आधी चुरा केलेला खडक अगदी थोड्या वेळेकरता साधारण १००० सेल्सिअस पर्यंत तापविला जातो. त्यामुळे आतील स्फटनाचे पाणी विस्फारते आणि परलाईटला त्याच्या आधीच्या आकारमानापेक्षा वीसपट वाढविते.
PERLIGRAN® हा एक शुद्ध खनिज पदार्थ आहे, आणि त्यामुळे वनस्पतींच्या आरोग्यास निर्धोक. वनस्पती संवर्धनात कोठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडण्याची त्यामुळे शक्यता नाही. मृदाहीन कृषी मध्ये PERLIGRAN® चा हा आरोग्यास निर्धोकपणा PERLIGRAN® वापरल्यानंतर सुद्धा एका विशेष वाफविण्याच्या प्रक्रियेने पुनरुज्जीवित करता येतो. अशा पद्धतीने PERLIGRAN® चा शुद्ध स्थितीमध्ये जमिनीसारखे माध्यम म्हणून वापरल्यास ५ वेळा पुनर्वापर करता येतो.
गेल्या काही दशकांपासून RHP ही कल्चर सबस्ट्रेट या विषयातील विख्यात संस्था समजली जाते. (RHP ही त्या डच संस्थेची आद्याक्षरे आहेत). RHP चे प्रमाणपत्र हे उत्पादनाची सुरक्षितता, शुद्धता, गुणवत्ता नियंत्रण, तृणमुक्तता आणि संशोधन व विकास या बाबतीत स्टॅण्डर्ड पाळले गेले असल्याची हमी देते.
PERLIGRAN® हे सेंद्रिय विचारसरणीशी अनुरूप असून, FiBL म्हणजे स्विस सेंद्रिय शेती संशोधन संस्था या संस्थेकडून सेंद्रिय शेती व उद्यानकृषीसाठी मान्यता असलेला, जमिनीचा कस वाढवणारा असा एकमेव परलाइट पदार्थ आहे.
PERLIGRAN® हे सतत खात्रीलायकपणे उच्च दर्जामध्ये पुरविले जाते. मिलोस या ग्रीक बेटावर परलाइट खाणींमध्ये आमच्या कंपनीची गुंतवणूक आहे. तेथे कच्च्या मालाचे उत्पादन होते, व कंपनीची स्वतःची उत्पादन सुविधा आहे, ज्यामुळे पुरवठा खात्रीलायकपणे केला जाऊ शकतो, व गुणवत्तेचा दर्जा कमी-जास्त होत नाही.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीत हवा खेळती ठेवण्यासाठी व जमिनीतील ओलावा नियंत्रित ठेवण्यासाठी PERLIGRAN® हे बागायती मध्ये जगभर यशस्वीरित्या वापरात आहे. याचे कारण म्हणजे खास या उपयोगांकरता त्याचे केलेले परिष्करण.
अर्थातच PERLIGRAN® शुद्ध खनिज जमीन सुधारक हे जमिनीत मिसळल्यावर, त्याची मोठी पाणी साठविण्याची क्षमता, त्याचा मूळवाढीवर अनुकूल परिणाम आणि त्याची मोकळी आणि हवेशीर जमीन या गुणांमुळे छंद म्हणून बागकाम करणाऱ्यांना सुद्धा फायदेशीर असते.
शेतीसाठीच्या, वनस्पती लावलेल्या, किंवा छंदासाठी वापरात असलेल्या जमिनीत वाढत्या प्रमाणात PERLIGRAN® आढळून येते.
खाजगी वापराकरिता अर्थातच बागकाम सामानाच्या दुकानातून PERLIGRAN® मिळू शकेल.
उद्यान व कृषीविज्ञानात सुद्धा PERLIGRAN® च्या गुणधर्मांची कदर केली जाते.
गवताची मुळे जमिनीत जास्त भक्कमपणे रुतली जावीत याकरिता नवीन गॉल्फ मैदानाच्या हिरवळीवर ते वापरले जाते, तसेच खूप वर्दळीच्या बागांमध्ये अथवा मैदानावर जमीन घट्ट राहावी यासाठीदेखील त्याचा वापर होतो.
याशिवाय समस्यापूर्ण लागवडीच्या जमिनीची सुधारणा PERLIGRAN® ने साधता येते.
ओल्या, हवा कमी असलेल्या ठिकाणी हवेची हालचाल व कणी रचना यांचे कायमस्वरूपी जतन ते करते, ज्यामुळे झाडांच्या मुळांचा अत्युत्तम प्रकारे विकास होऊ शकतो.
त्याचे मिश्रण करून हलक्या, रेताड जमिनीची पाणी साठवायची क्षमता स्पष्टपणे वाढविता येते.
त्यामुळे झाडांना पाणी कमी द्यायला लागते व कोरडेपणामुळे होणारी हानी टळते.
PERLIGRAN® भाज्यांच्या लागवडी करताही योग्य आहे, विशेषकरून जेथे जमीन अवघड, म्हणजे फार ओली किंवा रेताड असेल तेथे.
पुरेशी हवा खेळत नाही अशा ओल्या जमिनीत जर परलाइट मिसळले, तर ती जास्त सैल होते, तिची रचना सुधारते, व त्यामुळे हवा व पाण्याला वाट मिळते. अति रेताड किंवा हलक्या जमिनीत PERLIGRAN® मिसळल्यास जमिनीची पाणी साठविण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कोरडेपणामुळे होणारी हानी टळते.
शोभेकरिता वापरल्या जाणाऱ्या फुलांची लागवड करण्याकरता PERLIGRAN® जमीन अथवा टॉर्फ सबस्ट्रेट यांकरिता बदली म्हणून वापरता येते.
झाडांची लागवड शुद्ध परलाइट मध्ये केली जाते. फुगलेल्या परलाइटच्या पृष्ठभागावर हवा आणि पाण्याकरिता जागा तयार होते.
त्यामुळे पाण्याची साठवण आवश्यक तेवढी होते, फुले लावलेली जमीन हळू-हळू सुटी होते आणि मुळांची वाढ सुधारते.
रासायनिक खत घालण्याचा संगणक वापरून अचूक पाणी व पोषक द्रव्ये पुरवठा करणे देखील शक्य आहे.
छंदाकरिता किंवा व्यावसायिक कामाकरिता वापरल्या जाणाऱ्या जमिनीत परलीग्रॅन मिश्रित केल्यामुळे तिला योग्य तेवढी हवा मिळते, ती जास्त चांगली ओली होते, जास्त पाणी साठवते व तिची रचना जास्त स्थिर असते.
अशा रीतीने PERLIGRAN® मिश्रित सबस्ट्रेट विशेषकरून अशा झाडांना चांगले असते, ज्या झाडांची जास्त काळजी घ्यावी लागते, आणि ज्यांच्या मुळांना सुटे-सुटे, हवेशीर सबस्ट्रेट दिल्यामुळे ती जोरदार, निरोगी वाढ दाखवतात.
गाळल्यामुळे PERLIGRAN® हे कणी च्या घर्षणामुळे होणाऱ्या सूक्ष्म तुकड्यांपासून मुक्त असते. या तुकड्यांमुळे पाणी दिल्यावर जमीन घट्ट होऊ शकते.
PERLIGRAN® प्रीमियम तर दोनदा गाळले जाते व पूर्ण धूळमुक्त असते.
शुद्ध, नैसर्गिक PERLIGRAN® त्याच्या सर्वोत्तम गुणधर्मांमुळे माती व जमीन न वापरता, शोभेची कापून वापरली जाणारी फुले व भाज्यांच्या लागवडीकरता अगदी योग्य आहे.
खनिज माध्यम असल्यामुळे ते वनस्पतींच्या आरोग्यास निर्धोक, पी एच-न्यूट्रल व रासायनिक दृष्ट्या अक्रिय आहे.
त्यामुळे बहुमूल्य झाडे व झाडांचे कल्चर सबस्ट्रेट शिरकावापासून सुरक्षित राहतात.
परंतु त्याचबरोबर पोषक द्रव्ये व पाणी अगदी आपल्याला पाहिजे तेवढेच अचूकपणे देता येतात.
हैड्रोपॉनिकस करिता विशेष स्वारस्याचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वाफ देऊन PERLIGRAN® पाच वेळा पुन्हा पुन्हा वापरता येते.
आणि हे संपल्यानंतर ते सहजपणे फुकट न जाता जमिनीत समावेशक म्हणून वापरता येते.
PERLIGRAN® ची सच्छिद्रता एकूण घनफळाच्या ९५ टक्के असते, ज्यामुळे सबस्ट्रेट मध्ये हवा खेळती राहते. झाडांच्या अगदी सूक्ष्म मुळांसाठी सुध्दा ही एकदम अनुकूल परिस्थिती आहे.
कोठले PERLIGRAN® निवडले जाते, उदाहरणार्थ PERLIGRAN® प्रीमियम किंवा PERLIGRAN® क्लासिक, त्याप्रमाणे त्याची पाणी साठविण्याची क्षमता २८ ते ५० टक्के असू शकते.
जास्त केशकत्वामुळे PERLIGRAN® खूपच जलद ओलावा शोषण करू शकते. त्याचबरोबर ते ओलाव्याचा नीट निचरा करू शकते आणि पाण्याचे साचणे टाळू शकते.
त्याव्यतिरिक्त PERLIGRAN® क्षारमुक्त, पोषकमुक्त व पी एच-न्यूट्रल असते. त्याचे कोरडे वजन प्रति घनफूट फक्त ९० कीलो असते, ज्यामुळे ते सहजपणे हाताळता आणि हलविता येते.
१०० टक्के नैसर्गिक PERLIGRAN® चा खालील कोठलाही प्रकार जोरदार, निरोगी मुळांच्या वाढीसाठी गरज असलेली परिस्थिती तयार करतो, ज्यामुळे बळकट झाडे व त्यातून मोठी प्राप्ती लाभतात.
गाळण्याची प्रक्रिया व कणीचा आकारमान याबाबतीत आपली निवड करा. निवड करण्यात मदत: PERLIGRAN® बेसिक हे सबस्ट्रेट सुधारण्यासाठी, आणि शेतीसाठी ओली, जड जमीन असेल तर वापरण्यासाठी. PERLIGRAN® प्रीमियम हे अत्युच्च दर्जाचे उत्पादन आहे. ते हैड्रोपॉनिकस क्षेत्रात नवीन प्रमाण प्रस्थापित करत आहे. PERLIGRAN® ऑरगॅनिक हे जैविक जमीन सुधारक आहे. ते झाडांची वाढ त्यांच्या नैसर्गिक परिस्थिती सदृश करते.
उत्पाद | कणीचा आकारमान | गाळण्याची प्रक्रिया |
---|---|---|
PERLIGRAN® क्लासिक | 0-6 मि.मी. | – |
PERLIGRAN® एक्स्ट्रा | 2-6 मि.मी. | एकदा गाळलेले |
PERLIGRAN® मीडियम | 0-3 मि.मी. | – |
PERLIGRAN® प्रीमियम | 2-6 मि.मी. | दोनदा गाळलेले |
थेट येथे मागवा!
एकदा PERLIGRAN® स्ट्वतः हातात घेऊि बघा आनण त्याचा खास रचिेबद्दल आनण सवोत्तम गणुधमांबद्दल खात्री करूि घ्या!
तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर मिळावीत, यासाठी आपली विनंती कृपया इंग्रजीमध्ये लिहावी.